Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हातात सोपवली नव्या कारची चावी; किंमत ऐकून डोळे विस्फारतील…

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने दिवाळीच्या मुहूर्तावर दुबईत आलिशान घर खरेदी केलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्याने घर खरेदी केल्यानंतर नवी अलिशान महागडी कारही खरेदी केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 24, 2024 | 04:03 PM
विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हातात सोपवली नव्या कारची चावी; किंमत ऐकून डोळे विस्फारतील...

विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हातात सोपवली नव्या कारची चावी; किंमत ऐकून डोळे विस्फारतील...

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) ह्याने काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या मुहूर्तावर दुबईत आलिशान घर खरेदी केलं होतं. त्याने घर खरेदी केल्यानंतर अवघ्या इंडस्ट्रीत त्याची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने घर खरेदी केल्यानंतर नवी अलिशान महागडी कारही खरेदी केली आहे. विवेकने ब्रँड न्यू रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत न्यू ब्रँडेड कारची झलक शेअर केली आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता आणि त्याची फॅमिली कारवरील पडदा उचलताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेता आपल्या फॅमिलीला राईड करून दाखवतानाही दिसत आहे. विवेक ओबेरॉयने सिल्व्हर-ग्रे रंगाची रोल्स रॉयसची झलक चाहत्यांना इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. कार पार्किंगमधून बाहेर काढून त्याने आपल्या आई वडिलांना बसवलं. नंतर बायकोला बसवलं. चौघांनी ब्रँड न्यू कारमधून राईड एन्जॉय केली. विवेकने कॅप्शनमध्ये लिहिले, “यश हे वेगवेगळ्या आकारात आणि साच्यात येतं, आज ते यापद्धतीने आलं आहे. आयुष्यातले हे खास क्षण कुटुंबासोबत साजरे करता येतायेत यासाठी मी कृतज्ञ आहे.”

विवेकने कारमधून आई, वडील सुरेश ओबेरॉय आणि पत्नी प्रियांका अल्वासोबत सैर केली. सुरेश ओबेरॉय यांनी न्यू ब्रँडेड कार पाहून लेकाला मिठी मारली. विवेक ऑबेरॉयची नवीन कार पाहून फक्त चाहत्यांनीच नाही तर त्याच्या अनेक सेलिब्रिटी फ्रेंड्सनेही व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. विवेक ओबेरॉय कधी मुंबईत तर कधी दुबईत राहतो. रियल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्याची बरीच गुंतवणूक आहे. तो शिवाय, फिल्म मेकिंगमधूनही रग्गड पैसा कमावतो. यापूर्वी अभिनेत्याकडे लॅम्बॉर्गिनी आणि मर्सिडीज या कारचंही कलेक्शन आहे.

तुझं यश पाहून बरं वाटतंय, तू या आनंदासाठी पात्र आहेस, असंच पुढे जात राहा, तू असाच पुढे जा, अशीच तुझी प्रगती व्हावी हीच माझी सदिच्छा… अशा कमेंट्स चाहत्यांच्या आहेत. तर राखी सावंतनेही फायर इमोजी कमेंट केली आहे. विवेकने ऑबेरॉयने रोल्स रॉयस न्यू ब्रँडेड कार दुबईत खरेदी केली आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, विवेकने खरेदी केलेल्या ब्रँड न्यू कारचं नाव Rolls Royce Cullinan Black Badge असं असून त्या कारची किंमत तब्बल १२.२५ कोटी एवढी आहे.

Web Title: Vivek oberoi buys luxurious rolls royce and takes family for a drive share video with fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 04:03 PM

Topics:  

  • Dubai
  • vivek oberoi

संबंधित बातम्या

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
1

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
2

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Flydubai 1073: फ्लायदुबई हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर; सौदी अरेबियात केली तातडीची शस्त्रक्रिया
3

Flydubai 1073: फ्लायदुबई हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर; सौदी अरेबियात केली तातडीची शस्त्रक्रिया

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
4

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.