Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Crisis: ‘विमानाने दुबईला गेला अन्…’ हादीचा मारेकरी मोकाट; स्वतःच VIDEO जारी करून फाडला ढाका पोलिसांचा मुखवटा

Osman Hadi Murder: 12 डिसेंबर रोजी ढाका येथे प्रचारादरम्यान उस्मान हादी यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यांना उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले, जिथे 18 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 31, 2025 | 12:44 PM
Expose Bangladesh's lies Usman Hadi's killer was hiding in Dubai not India He released the video himself

Expose Bangladesh's lies Usman Hadi's killer was hiding in Dubai not India He released the video himself

Follow Us
Close
Follow Us:
  •  उस्मान हादी हत्याकांडातील मुख्य संशयित फैसल करीम मसूद भारतात नाही, तर दुबईत असल्याचे स्वतः व्हिडिओ जारी करून स्पष्ट केले आहे.
  •  ढाका पोलिसांनी फैसल भारतात पळाल्याचा दावा केला होता, मात्र मेघालयातील BSF ने घुसखोरीचे सर्व दावे आधीच फेटाळून लावले होते.
  •  फैसलने आपण निर्दोष असल्याचे सांगत, या हत्येमागे उस्मान हादी यांची स्वतःची संघटना ‘जमात’ आणि राजकीय कटाचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

Osman Hadi murder case latest news 2025 : बांगलादेशातील (Bangladesh) प्रभावशाली तरुण नेते आणि ‘इन्कलाब मंच’चे प्रवक्ते उस्मान हादी (Osman Hadi) यांच्या हत्येप्रकरणी आता एक अत्यंत नाट्यमय वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फैसल करीम मसूद हा भारतात पळून गेल्याचा दावा बांगलादेश सरकारने आणि ढाका पोलिसांनी केला होता. मात्र, आता फैसलने स्वतः एक व्हिडिओ जारी करून बांगलादेशच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे. फैसल भारतात नाही, तर चक्क दुबईमध्ये सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या दाव्याचा फुगा फुटला!

उस्मान हादी यांच्यावर १२ डिसेंबर रोजी ढाक्यात गोळीबार झाला होता, त्यानंतर १८ डिसेंबरला सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ढाका महानगर पोलिसांनी असा दावा केला होता की, मुख्य संशयित फैसल करीम मसूद हा हलुआघाट सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात पळून गेला आहे. भारताने मात्र हा दावा फेटाळून लावला होता. मेघालयातील बीएसएफ (BSF) महानिरीक्षकांनी स्पष्ट केले होते की, सीमेवरून कोणतीही घुसखोरी झाल्याचा पुरावा नाही. आता फैसलच्या व्हिडिओने भारताची बाजू अधिक भक्कम केली असून बांगलादेश पोलिसांचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट

“मी निर्दोष आहे, हत्येमागे जमातचा हात!”

दुबईतून जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये फैसल करीम मसूदने स्वतःला निर्दोष जाहीर केले आहे. तो म्हणतो, “उस्मान हादी यांच्या हत्येशी माझा कोणताही संबंध नाही. केवळ व्यावसायिक कारणांमुळे आमचा संपर्क होता. मी एक आयटी कंपनीचा मालक असून, व्यवसायासाठी काही राजकीय देणग्या दिल्या होत्या, पण तो कोणत्याही कटाचा भाग नव्हता.” फैसलने पुढे एक खळबळजनक दावा केला की, उस्मान हादी ज्या ‘जमात’ संघटनेशी संबंधित होते, त्या संघटनेतील अंतर्गत वादातून किंवा राजकीय द्वेषातून त्यांची हत्या झाली असावी. आपल्या जिवाला धोका असल्याने आपण दुबईला गेल्याचे त्याने सांगितले.

Faisal Karim Masud, one of the key accused in the Osman Hadi murder case, said in a video message that he is currently in Dubai and has no involvement in the killing. He claimed that the murder was carried out by Jamaat-Shibir. According to Faisal, his association with Hadi was… pic.twitter.com/vghSIAILJE — Sahidul Hasan Khokon (@SahidulKhokonbd) December 30, 2025

credit : social media and Twitter

दुबईतील वास्तव्याचे पुरावे आले समोर

मिळालेल्या माहितीनुसार आणि उपलब्ध कागदपत्रांनुसार, फैसल करीम मसूद खरोखरच दुबईमध्ये आहे. त्याच्याकडे डिसेंबर २०२२ मध्ये जारी केलेला पाच वर्षांचा मल्टिपल-एन्ट्री युएई (UAE) व्हिसा आहे. त्याने कायदेशीररित्या विमान प्रवास करून दुबई गाठली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, तो भारतात पळाल्याचा दावा करून बांगलादेश सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Vs UAE: येमेनचे होणार दोन तुकडे? जाणून घ्या कसे फुटीरतावादी संघटना ‘STC’ मुळे दोन महासत्ता एकमेकांना भिडल्या

कोण होते उस्मान हादी?

उस्मान हादी हे बांगलादेशातील अलिकडच्या जनआंदोलनानंतर एक अत्यंत प्रभावशाली युवा नेते म्हणून समोर आले होते. आगामी संसदीय निवडणुकीत ते उमेदवारही होते. त्यांच्या हत्येमुळे बांगलादेशच्या राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. आता मुख्य आरोपीनेच व्हिडिओ जारी करून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केल्यामुळे, या हत्येचे गुढ अधिकच वाढले आहे. या प्रकरणातील सत्य शोधण्याऐवजी भारतावर आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्या बांगलादेश सरकारला आता जागतिक स्तरावर उत्तर द्यावे लागणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उस्मान हादी कोण होते आणि त्यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: उस्मान हादी हे बांगलादेशातील 'इन्कलाब मंच'चे नेते होते. १२ डिसेंबर रोजी त्यांच्यावर गोळीबार झाला आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  • Que: मुख्य आरोपी फैसल करीम मसूद सध्या कुठे आहे?

    Ans: बांगलादेशने तो भारतात पळाल्याचा दावा केला होता, परंतु स्वतः व्हिडिओ जारी करून त्याने तो दुबईमध्ये असल्याचे सिद्ध केले आहे.

  • Que: फैसलने हत्येबाबत काय दावा केला आहे?

    Ans: त्याने आपण निर्दोष असल्याचे सांगत, हत्येमागे उस्मान हादी यांच्याच संघटनेचा (जमात) किंवा राजकीय कटाचा हात असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Bangladeshs brass exposed usman hadis killer was hiding in dubai not india he released the video himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Dubai
  • International Political news

संबंधित बातम्या

Saudi Vs UAE: येमेनचे होणार दोन तुकडे? जाणून घ्या कसे फुटीरतावादी संघटना ‘STC’ मुळे दोन महासत्ता एकमेकांना भिडल्या
1

Saudi Vs UAE: येमेनचे होणार दोन तुकडे? जाणून घ्या कसे फुटीरतावादी संघटना ‘STC’ मुळे दोन महासत्ता एकमेकांना भिडल्या

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप
2

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप

Khaleda Zia यांच्यावर आज अत्यसंस्कार; भारताकडून जयशंकर उपस्थित, तर पाकिस्तानकडून कोण?
3

Khaleda Zia यांच्यावर आज अत्यसंस्कार; भारताकडून जयशंकर उपस्थित, तर पाकिस्तानकडून कोण?

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या
4

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.