
साऊथची सुपरस्टार सामंथा प्रभू ‘द फॅमिली मॅन 2’ OTT मालिकेत मनोज बाजपेयीसोबत काम करत आहे. आणि तिच्या अभिनयालाही खूप पसंती दिली गेलीये. ही अभिनेत्री आता हळूहळू बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. सामंथाचा दक्षिणेत दबदबा आहे. आता संपूर्ण देशातील अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव सर्वात वर हवे आहे. आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये मागे टाकण्यासाठी सामंथाने असे काही केले की बघून सगळेच थक्क झाले.
अलीकडेच, PR एजन्सी Ormax ने जून 2022 चे रेटिंग दिले आहे, ज्यामध्ये जून महिन्यात देशातील दहा सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण आहेत हे सांगण्यात आले आहे. या यादीत दक्षिणेतील कलाकारांचाही समावेश आहे. या रेटिंगमध्ये, Ormax Stars India Loves- सर्वात लोकप्रिय अभिनेत्री सामंथा प्रभू पहिल्या क्रमांकावर आहे आणि आलिया भट्ट दुसऱ्या स्थानावर आहे. नयनतारा तिसऱ्या क्रमांकावर असून या यादीत काजल अग्रवाल, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, अनुष्का शेट्टी या अभिनेत्रींचा समावेश आहे.
अलीकडेच सामंथा प्रभू अक्षय कुमारसोबत कॉफी विथ करणवर आली होती. शोच्या सुरुवातीलाच सामंथाने करणला सांगितले होते की, तिने या यादीत पहिले येण्यासाठी ‘Ormax’ला पैसे दिले आहेत.
शो सुरू झाल्यानंतर काही वेळातच करण जोहरने स्क्रीनवर ही यादी दाखवताना याचा उल्लेख केला. करणने सांगताच सामंथाने कपूर कुटुंबातील सून आलिया भट्टलाही मागे टाकले आहे, सामंथा म्हणाली की, या यादीत प्रथम येण्यासाठी तिने एका पीआर एजन्सीला पैसे दिले आहेत हे तिला कबूल करायचे आहे.