Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejaswini Pandit: आई काय बोलू…अजून sink in होत नाहीये गं, तेजस्विनी पंडितने आईच्या निधनानंतर तब्बल १६ दिवसांनी केली भावुक पोस्ट

“आई काय बोलू……. अजून sink in होत नाहीये गं तू नाहीस. आपली International Girls Trip राहिली, कथा चा पहिला वाढदिवस जोरदार करणार होतो आपण. तेजस्विनी पंडितचीची भावुक पोस्ट केली शेअर.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 31, 2025 | 06:30 PM
Tejaswini pandit (फोटो सौजन्य: social media )

Tejaswini pandit (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या आई आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन १६ ऑगस्ट २०२५ रोजी झालं. ज्योती चांदेकर यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. तेजस्विनी पंडित ही तिच्या आईच्या निधनामुळे कोलमडून गेली आहे. अभिनेत्रीने तब्बल १६ दिवसांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या आईचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच तिने एका व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात तिने तिच्या आईला श्रदांजली वाहिली असून तिच्याबद्दल भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Priya Marathe : मालिकेच्या दरम्यान तिचा त्रास वाढला पण….; प्रिया मराठे बद्दल सुबोध भावेची भावूक पोस्ट

पोस्ट मध्ये काय?
“आई काय बोलू……. अजून sink in होत नाहीये गं तू नाहीस. आपली International Girls Trip राहिली, कथा चा पहिला वाढदिवस जोरदार करणार होतो आपण, आपल्या फार्म वर new year celebrate करायचा होता. तुझ्यावरचं पुस्तक प्रकाशन आज तुझ्या वाढदिवसाला करायचं होतं आपल्याला, त्याचं किती काम बाकी राहून गेलं…. आई तू ना प्रचंड हट्टी होतीस . किती वर्ष तुला सांगते होते आधी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष दे. पण काम सोडून काहीच सुचलं नाही तुला. मला नेहमी म्हणायचीस काम करता करता मरण यावं. कित्येकदा तुला सांगितलं तुझ्या मुली खमक्या आहेत. तू आता फक्त तुझ्या आनंदासाठी काम कर. तुझ्या terms वर. पण कामाप्रती तुझी श्रद्धा काही औरच होती. आणि बरोबरच आहे, कामात स्वतःचा आनंद असणारी,मानणारी माणसं आजच्या पिढीत क्वोचितच सापडतात. खूप निग्रही, निष्ठावंत, मेहनती होतीस तू आई.

खूप धावपळ, खूप काम केलंस. खूप खस्ता खात, कष्ट करत आम्हाला वाढवलंस. कधीच त्या कष्टाची तक्रार केली नाहिस. पण वयानुसार मन मोठं होत असलं तरी शरीर थकतं हेही समजून घायला हवं होतंस ना गं आई! का ग अंगावर काढलंस सगळं? पत्ताच लागू दिला नाहीस काहीच. ३ दिवसात होत्याचं नव्हतं झालं ! माझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलं आई……… बाबा हाक मारता येत नव्हती आता आई हाक मारली तर ओ द्यायला कुणीच नसेल का गं ???

आई, तू कलाकार म्हणून भन्नाटच होतीस, आहेस आणि राहशील. तुझ्या भारदस्त आवाजाने आणि पाणीदार डोळ्यांनी तू प्रेक्षकांना कायम भारावून टाकायचीस…..कलाकार हा नेहमीच त्याच्या कलाकृतीतून जिवंत राहतो. त्यामुळे तू आहेसच , असशीलच. तुझ्यावरचं प्रेक्षकांचं प्रेम बघून खूप कौतुक वाटायचंच, ह्यावेळेला मात्र अभिमानाने ऊर भरून आला. तुझ्यासारख्या कलाकाराच्या पोटी मी जन्माला आले ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय !!

आणि माझी काळजी करू नकोस. तू स्वतः आयटीत जगलीस, त्यामुळे मला जसं वाढवलं आहेस तशीच मी जगेन. रूबाबात. fearless. जिंदादिल. आणि दीदी आणि कथा ची काळजी घेईन. तुझ्या अर्धवट राहिलेल्या इच्छा आम्ही दोघी मिळून पूर्ण करू ! तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन आणि तुझा प्रेरणादायी प्रवास त्या पुस्तकरूपी वाचकांसमोर/ प्रेक्षकांसमोर आणेन. आता तरी तू आराम कर. तुझा पुढचा प्रवास ज्योतीर्मय, शांतीने आणि आनंदात होऊदेत. बाबावर करायचं राहिलेलं सगळं प्रेम करून घे. तुम्हाला आता कुणी वेगळं करू शकत नाही. Cheers … बाबाला माझ्याकडून पप्पी दे. आणि दोघेही आमच्यावर लक्ष ठेवा आणि आशीर्वाद देत रहा बस !!”, अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने केली आहे.

Priya Marathe: देव का असं करतो? मला काही कळत नाही…; प्रिया मराठेच्या निधनाची बातमी मिळताच उषा नाडकर्णीं यांनी फोडला हंबरडा

Web Title: What can i say motherit still doesnt sink in tejaswini pandit made an emotional post 16 days after her mothers death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

‘ठरलं तर मग’चे 900 भाग पूर्ण, पूर्णा आजीच्या आठवणीने जुई गडकरी भावूक, म्हणाली आजीच्या नावाने….
1

‘ठरलं तर मग’चे 900 भाग पूर्ण, पूर्णा आजीच्या आठवणीने जुई गडकरी भावूक, म्हणाली आजीच्या नावाने….

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
2

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
3

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती
4

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.