अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. 2 वर्ष प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र आज सकाळीच तिची प्राण ज्योत मालवली आहे. या सगळ्यावर अभिनेता सुबोध भावे याने पोस्ट शेअर केली आहे.
मराठी आणि हिंदी मालिका विश्वात देखील प्रियाने तिचं स्थान मिळवलं होतं. प्रियाबाबत सांगतना सुबोध म्हणाला की, प्रिया मराठे “एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार.पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाच नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण.या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत,कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या.प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली.
काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली.पण त्या कॅन्सर ने काही तिची पाठ सोडली नाही.” तू भेटशी नव्याने ” या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला.या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनु मोघे भक्कम पणे तिच्याबरोबर होता.माझी बहीण लढवय्या होती,पण अखेर तिची ताकद कमी पडली.प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजलीतू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना
ओम शांती..
प्रिया मराठे सुबोध भावेची चुलत बहिण. आजवर दोघांनी अनेकदा नाटक सिनेमा आणि मालिकांमधून एकत्र येत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी या सिनेमातील दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. मराठी नाटक, सिनेमा आणि मालिका विश्वात प्रिया मराठेने स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिचं असं निघून जाण्याने मराठी कलाकर आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. प्रिया मराठेने आजवर साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.