अनिल कपूरमुळे नाना पाटेकर यांच्या हातातून निसटली 'परिंदा'मधली भूमिका, अभिनेत्याला व्यक्त केली खंत
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये नाना पाटेकरचं नाव येतं. त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच नाना पाटेकर यांनी एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत नाना पाटेकरांनी अनिल कपूर मुळेच ‘परिंदा’ चित्रपट त्यांच्या हातातून निसटल्याचा खुलासा केला आहे. याशिवाय अनेक गोष्टींबद्दल नाना पाटेकर यांनी मुलाखतीत खुलासा केला आहे. नुकतेच नाना पाटेकर यांनी अनिल कपूरसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. १९८९ मध्ये रिलीज झालेल्या विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित चित्रपटात जॅकी श्रॉफने नाना पाटेकर यांची जागा घेतली होती. याबाबत नाना पाटेकर बोलत होते. हा बदलही अनिल कपूरमुळेच झाल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.
नाना पाटेकर म्हणाले, “मला ‘परिंदा’च्या वेळी तू (अनिल कपूर यांनी) खूप त्रास दिला आहे. मी तुला सांगतो, मी या चित्रपटात भावाची भूमिका साकारणार होतो. आपण रिहर्सलही सुरू केली होती. अनिलमुळे मला काढून टाकण्यात आले आणि जॅकीला या चित्रपटात घेण्यात आले. तथापि, मी त्याचे आभार मानू इच्छितो, कारण त्याने जॅकीचा आग्रह धरला नसता तर मला ‘अण्णा’ची भूमिका साकारायला मिळालीच नसती. मी चुकीचा असू शकेल, परंतु मला वाटलं की ‘परिंदा’मधील माझ्या भावाच्या भूमिकेसाठी जॅकी हा सर्वोत्तम पर्याय असेल.”
बादशाहच्या जीवाला धोका? रॅपरच्या पंजाबमधील क्लबमध्ये मध्यरात्री झाला स्फोट, पोलीस तपासात गुंतले!
ते वैयक्तिक नसल्याचे मला अनिल कपूर यांनी सांगितले होते, त्याने एक सहज दिग्दर्शकाला सूचना दिली होती. पण तो अंतिम निर्णय दिग्दर्शकाचाच होतचा, असे अनिल कपूर म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर म्हणाले, “परंतू तुम्ही कलाकार होते. सहाजिकच आहे ते तुमचंच ऐकणार. नक्कीच जॅकीने चित्रपटात खूप चांगलं काम केलं होतं. त्या चित्रपटासाठी जॅकीला फिल्मफेयर देखील मिळाला होता. ” ‘परिंदा’मध्ये अनिल कपूरसोबत जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले.