"...म्हणून मी त्याला डेट करत नाही"; अनुष्का शर्माने सांगितलं रणवीर सिंहला डेट न करण्यामागचं खरं कारण
मनीष शर्मा दिग्दर्शित, ‘बँड बाजा बरात’ चित्रपट २०१० साली रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग होते. या चित्रपटाच्या माध्यमातून रणवीरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. तर अनुष्काने शाहरुख खानच्या ‘रबने बनादी जोडी’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती.
‘बँड बाजा बरात’ आणि ‘दिल धडकने दो’ या दोन्हीही चित्रपटात अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगने एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित पाहिलेली ही जोडी चाहत्यांना रियल लाईफमध्येही एकत्र पाहायची होती. ही ऑनस्क्रीन जोडी रियल लाईफमध्ये एकमेकांचे चांगले मित्र होते. अनुष्काने एका जुन्या मुलाखतीत तिने केव्हाच रणवीर सिंहला डेट केले नाही, असा खुलासा केला आहे.
‘Jaat’ चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, केली बंदीची मागणी; नेमकं प्रकरण काय ?
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने २०११ साली एनडीटीव्हीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत अनुष्काला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, “रणवीर असा का म्हणाला होता की, तो गर्लफ्रेंड म्हणून तुला सांभाळू शकणार नाही. ती तिच्या बॉयफ्रेंडला मारुन टाकेल…” त्या प्रश्नावर उत्तर देताना अनुष्का म्हणाली होती की, “केव्हाच रणवीर माझा बॉयफ्रेंड होऊ शकत नाही. तो खूप चांगला मुलगा आहे. शिवाय मेहनती सुद्धा आहे. सध्या तो त्याच्या करियरमध्ये गुंतलेला आहे आणि जे त्यानं असलंही पाहिजे. ‘बँड बाजा बरात’ हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे आणि तो या चित्रपटातूनच इंडस्ट्रीमध्ये आलाय. त्यामुळे स्वत:मध्ये गुंतणं हे सहाजिक आहे. मला अनेकदा प्रश्न विचारण्यात आला की, तू आणि रणवीर एकमेकांना का नाही डेट करत ? या प्रश्नावर मी त्यांना कायमच हेच सांगते की, ‘मला माझ्या आयुष्यात असा बॉयफ्रेंड हवाय की, जो दिवसाच्या शेवटी फक्त स्वतःचा दिवस कसा गेला हे सांगणार नाही; तर तो मलाही विचारेल की, तुझा दिवस कसा गेला, जे रणवीर कधीच करणार नाही.’ म्हणून मी रणवीरला केव्हाच डेट करीत नाही.”
‘मला नाही फरक पडत..’., गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफवांवर सुनीता यांचे चोख उत्तर, Video Viral!
त्याच मुलाखतीदरम्यान, अनुष्का शर्माने हे देखील सांगितले की, ती स्वतः कोणत्याही अभिनेत्याला डेट करू शकत नाही. अभिनेत्री म्हणाली, “मला कलाकारांना डेट करायचे नाही कारण ते खूप स्वार्थी असतात. प्रत्येक कलाकार स्वत:चंच स्वार्थ पाहत असतात. आपण सर्वच स्वार्थी असतो, मी सुद्धा स्वार्थी आहे. मी अशा व्यक्तीसोबत राहू शकत नाही जो इतका स्वार्थी आहे.” दरम्यान, अभिनेत्रीने आपलं वक्तव्य खरं केलं. तिने क्रिकेटर विराट कोहलीला डेट करत २०१७ मध्ये त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अनुष्का शर्मा आणि लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहलीने डिसेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना वामिका आणि अकाय अशी दोन मुलं आहेत. तर दुसरीकजडे, रणवीर सिंहने दीपिका पादुकोणसोबत २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दुआ ही मुलगी आहे. कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचे, तर अनुष्का शेवटची किंग खानसोबत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. तर रणवीर सिंह लवकरच ‘डॉन ३’मध्ये दिसणार आहे.
सलमान खानला धमकी देण्यामागे काय होते कारण? आरोपीने केला धक्कादायक खुलासा!