(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटावर ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. चित्रपटातील एका दृश्यावरून हा वाद निर्माण होत आहे. भारतातील ख्रिश्चनांनी आता एका विशिष्ट दृश्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास चित्रपटातील कलाकार आणि क्रूविरुद्ध निषेध आणि कारवाईचा इशाराही दिला आहे. आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
झहीर आणि सागरिका झाले आई- बाबा; गोंडस बाळाचा फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी!
कोणत्या दृश्याबद्दल वाद सुरु?
चित्रपटातील एका दृश्यात रणदीप हुड्डा चर्चच्या आत दाखवला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ख्रिश्चन समुदायाने या दृश्यावर आक्षेप घेतला आहे. यामध्ये, रणदीपचे पात्र चर्चच्या आत, क्रॉसच्या अगदी खाली अभिनेता उभा आहे, लोक प्रार्थना करत असताना दिसत आहे. या दृश्यात धमक्या आणि गुंडगिरी दाखवल्याचा आरोप आहे. हा सीन आता लोक काढून टाकण्याची मागणी करत आहे.
लोक म्हणाले श्रद्धेचा अपमान
ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना हे दृश्य आवडले नाही. समुदायाच्या प्रतिनिधींनी असे म्हटले आहे की हे दृश्य जाणूनबुजून त्यांच्या श्रद्धेचा अपमान करत आहे आणि चर्चच्या पावित्र्याचा अनादर करते. त्यांनी असेही म्हटले की हे दृश्य समुदायातील लोकांना नकारात्मक दृष्टिकोनातून दाखवू शकते. असं ख्रिश्चन समुदायाचे म्हणणे आहे.
‘मला नाही फरक पडत..’., गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफवांवर सुनीता यांचे चोख उत्तर, Video Viral!
चित्रपट बंदीची मागणी
‘जाट’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी थिएटरबाहेर निदर्शने करण्याची योजना आखली होती, परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ते थांबले. त्यांनी निर्मात्यांना दोन दिवसांचा वेळ देण्याचे ठरवले. जर चित्रपटावर बंदी घातली नाही किंवा चित्रपटातून हे दृश्य काढून टाकले नाही तर ते थिएटरबाहेर निषेध करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘जाट’च्या निर्मात्यांनी अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. ‘जाट’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.