'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, "साकारत असलेली प्रत्येक भूमिका सर्वोत्कृष्ट…"
झी मराठीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेमुळे अभिनेता अक्षय म्हात्रे चर्चेत आला होता. मालिकेमध्ये अक्षयने आकाश हे पात्र साकारले आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असताना आजचा दिवस त्याच्यासाठी खास आहे. कारण आज (११ नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याच्या पत्नीने काही खास फोटोंचा आणि व्हिडिओंचा एक स्पेशल व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. शिवाय लांबलचक पोस्टही लिहिली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अक्षयची पत्नी म्हणते, “प्रिय पती, डोकावून पाहण्यापासून ते सिद्धिविनायकाला भेट देण्यापर्यंत आमचे नाते कसे पोहोचले काही कळलंच नाही. रिलेशनबद्दल घरी न माहित असल्यापासून ते पालकांनी सगळे सण आणि सुख दुःख एकत्र घालवण्यासाठी दिलेली परवानगी असो… आम्ही इथपर्यंत केव्हा आलो, काही कळलंच नाही. आम्ही खूप पुढे आलो आहोत! देवाने तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी देवाचे पुरेसे आभार मानू शकत नाही… तू माझ्यात सामर्थ्य आणलेस, माझ्या भीतीवर मात केलीस, माझी पर्स नेहमी पकडतो, जेव्हा मला स्वतःवर शंका येते तेव्हा मला फटकारतो… मला कायम राजकुमारीसारखे वागवतो… ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. पण तुझं सौंदर्य हे आहे की तू फक्त माझ्याच नव्हे तर संपूर्ण जगासोबत किती अद्भुत आहेस… तू दयाळू, प्रेमळ, काळजी घेणारा सहानुभूतीशील आणि मदत करणारा आहेस! तू साकारत असलेली प्रत्येक भूमिका सर्वोत्कृष्ट आहे… मग तो मुलगा असो, जावई असो, भाऊ असो, मित्र असो किंवा तुझा अभिनय असो! कधीही बदलू नकोस, जसा आहेस तसाच राहा… आज मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, देव तुला आशीर्वाद देवो ज्याने तुझ्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होवोत… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अक्षय…”
अक्षय म्हात्रेच्या पत्नीचं नाव श्रेनू पारिख असं आहे. ती सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अक्षय आणि श्रेनूने २१ डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांचीही ‘घर एक मंदिर’ मालिकेच्यानिमित्त सेटवर ओळख झाली. पहिले ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. कोरोना काळात मालिकेची शुटिंग सुरु असताना त्यांच्यात प्रेम झालं. ऑनस्क्रिन एकत्र आलेली जोडी रियल लाईफमध्येही एकत्र आलेली पाहायला मिळाली आहे.