सकाळी नाश्त्यात फळं खाणं नेहमीच आरोग्यदायी आणि चांगले मानले जाते. मात्र काही फळं अशी आहेत जी शरीराला फायदा नाही तर नुकसान पोहचवतात. कोणती आहेत ही फळं जाणून घ्या
केळी हा ऊर्जेचा चांगला स्रोत असला तरी ते रिकाम्या पोटी खाणे टाळावे. केळीमध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियम असते, ज्यामुळे रिकाम्या पोटी शरीरात मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे असंतुलन होऊ शकते. याचा हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो
संत्री हे लिंबूवर्गीय फळ सर्वात जास्त आवडते, परंतु ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने आम्लपित्त आणि पोटात जळजळ होऊ शकते. संत्र्यात असलेले अॅसिड रिकाम्या पोटी आपल्या पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी चांगले मानले जाते. पण रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पोटदुखी आणि गॅस तयार होण्याची शक्यता वाढते
लिचीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, जे रिकाम्या पोटी इंसुलिनच्या पातळीवर परिणाम करू शकते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो
आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. याशिवाय रिकाम्या पोटी आंबा खाल्ल्याने पोटात जडपणा आणि गॅस होऊ शकतो