मृत्यूला आमंत्रण देते 5G इंटरनेट! रेडिएशनने शरीराला पोहचत आहे हानी; संशोधनाने केले धक्कादायक खुलासे
संशोधन करताना, शास्त्रज्ञांनी दोन त्वचेच्या पेशी निवडल्या - केराटिनोसाइट्स आणि फायब्रोब्लास्ट्स. त्यानंतर त्यांनी ते 5G फ्रिक्वेन्सीच्या (27GHz आणि 40.5GHz) व्हेव्जच्या संपर्कात आणले
संशोधनाच्या शेवटी, असे आढळून आले की याचे DNA ला कोणतेही नुकसान होत नाही किंवा जनुकांच्या अभिव्यक्तीमध्ये (Gene Expression) कोणताही बदल घडून येत नाही, म्हणजेच 5G मुळे कोणतेही नुकसान झाले नाही
शास्त्रज्ञांनी आधीच सांगितले होते की जेव्हा शरीराचे तापमान वाढते तेव्हाच रेडिओ व्हेव्ज नुकसान करू शकतात. परंतु, या संशोधनात तापमान नियंत्रणात ठेवण्यात आले, ज्यामुळे कोणतीही हानी झाली नाही
या संशोधनातून हे स्पष्ट झाले की जर रेडिएशनमुळे शरीराचे तापमान वाढत नसेल, तर 5G व्हेव्ज कोणत्याही प्रकारचे जैविक नुकसान करत नाहीत
प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आपल्यासोबत नवीन भीती घेऊन येत असते आणि विज्ञान त्याची चाचणी करून पाहते. हे संशोधन स्पष्ट करते की आपण या नवीन तंत्रज्ञानावर विश्वास ठेवायला हवा की नको आणि मानावं लागेल की 5G इंटरनेट या विश्वाच्या यादीत खरा उतरला आहे