Akshay Kelkar Share Wedding Photos On Instagram Wife Sadhana Kakatkar
अक्षय आणि साधनाने ९ मे २०२५ रोजी लग्नगाठ बांधली. काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर अक्षयने लग्नाचे फोटोज शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांनी लग्नातील पारंपारिक विधी दरम्यानचे आणि रिसेप्शन दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
गेल्या १० वर्षांपासून अक्षय आणि साधना रिलेशनशिपमध्ये आहेत. रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले. लग्नामध्ये अक्षय आणि साधनाने एकमेकांना मॅचिंग लूक कॅरी करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.
लग्नसोहळ्यादरम्यान, अक्षयने पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान करत मरुन रंगाचे वेलवेट उपरणे घेतले होते. तर साधनाने लग्नसोहळ्यासाठी ऑफ व्हाईट रंगाची सुंदर साडी नेसली होती. शिवाय, अक्षयला मॅचिंग करत साधनाने साडीवर मरुन रंगाचे वेलवेट उपरणे घेतले होते.
तर, रिसेप्शनदरम्यान, अक्षयने व्हाईट कलरची शेरवानी आणि साधनाने ऑफ पिंक कलरची सुंदर साडी नेसली होती. दोघांच्याही लूकचे सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले जात आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर अक्षय आणि साधनाच्या लग्ना दरम्यानचे फोटोज् तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
अक्षय केळकर हा प्रसिद्ध अभिनेता असून कलर्स मराठीवरच्या 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा तो महाविजेता होता. तर, साधना ही एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते.