अभिनेत्री अमृता खानविलकरने "एकम" मधल्या पहिल्या दिवाळीची खास झलक आपल्या चाहत्यांना दिली आहे
अमृताने यावेळी पांढऱ्याशुभ्र रंगातील सलवार सूटचा फोटो शेअर केला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नाहीये
अमृताने या गोल्डन बॉर्डर वर्क केलेल्या ड्रेससह गळ्यात हिरव्या पाचूचे सेट असलेला नेकलेस परिधान केला आहे आणि तिची ही स्टाईल खूपच सुंदर दिसतेय
अत्यंत साधी पण तितकीच आकर्षक अशी हेअरस्टाईल या ड्रेससह अमृताने केली आहे आणि आपल्या हास्याने सर्वांना आपलंसं केलं आहे
कपाळावर लाल टिकली आणि बोटांना लाल नेलपेंट लावत तिने तिचे स्टाईल स्टेटमेंट पूर्ण केले आहे
अत्यंत क्लासी आणि न्यूड मेकअप करत अमृताने तिचा लुक खास केलाय. फाऊंडेशन, काजळ, लायनर, हायलायटर आणि न्यूड लिपस्टिक लावत तिचा हा दिवाळी लुक पूर्ण झालाय