
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रयागराजमध्ये सुरू असलेला माघ मेळा सध्या केवळ धार्मिक महत्त्वामुळेच नव्हे, तर वादग्रस्त आणि तीक्ष्ण विधानांमुळेही चर्चेत आहे. संतांचे आचरण, परंपरा आणि अधिकार याबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांचाही या वादात समावेश झाला आहे. यंदा माघ मेळ्यात अनुपस्थित राहण्यामागे गुप्त नवरात्रीचे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एक्स बॉलीवूड अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णी यांनी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वादावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या नक्की काय म्हणाल्या जाणून घेऊयात.
माघ मेळ्यातील ममता यांच्या अनुपस्थितीबद्दल, ममता कुलकर्णी म्हणाल्या की तिचे जीवन आता पूर्णपणे आध्यात्मिक साधना आणि तपस्येला समर्पित आहे. तिने स्पष्ट केले की, “मी गेल्या २५ वर्षांपासून तपश्चर्या करत आहे. मी दररोज गंगेच्या पाण्यात स्नान केल्यानंतरच पूजा आणि विधी करते. सध्या गुप्त नवरात्री सुरू आहे आणि मी नवरात्रीत बाहेर जात नाही.” म्हणूनच मी माघ मेळ्यात उपस्थित राहू शकली नाही असे त्यांनी म्हटले आहे.
Abhijit Majumdar Death: अभिजित मजुमदार यांचे निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती वादाबद्दल ममतांनी काय म्हटले?
मुलाखतीदरम्यान माघ मेळ्यात पालखी अडवण्याविरोधातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या निषेधाबाबत विचारले असता, ममता कुलकर्णी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण प्रकरणात शंकराचार्यांचा निर्णय त्यांच्या शिष्यांसाठी त्रासदायक ठरल्याचे त्यांनी म्हटले. त्या म्हणाल्या, “जर स्नान करायचे असते, तर पालखीतून उतरून संगमाकडे चालत जाता आले असते. गुरु असणे म्हणजे जबाबदारी आणि संयम दाखवणे; शिष्यांनी आपले जीवन धोक्यात घालावे, असा हट्ट धरणे योग्य नाही.”
ममता कुलकर्णी यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवर प्रश्न उपस्थित केले
ममता कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, राजा असो वा सामान्य माणूस, गुरु असो वा शिष्य, कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यांनी असे म्हटले की केवळ चार वेदांचे श्लोक पाठ केल्याने शंकराचार्य होत नाही. त्यांच्या मते, हा संपूर्ण वाद स्पष्टपणे अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा अहंकार आणि अज्ञानी दर्शवितो आहे.
तसेच, १८ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी, ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संगमात स्नान करण्यासाठी पालखीवरून प्रवास केला. त्यांच्यासोबत सुमारे २०० शिष्य होते. मोठ्या गर्दीमुळे, मेळा प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव पालखीला संगमात येण्यास मनाई केली आणि पायी स्नान करण्याचा सल्ला दिला. प्रशासनाने असा युक्तिवाद केला की पालखी घेऊन जाण्याने चेंगराचेंगरी होऊ शकते. परंतु, शंकराचार्य पालखीतून संगमात जाऊ इच्छित होते, ज्यामुळे प्रशासन आणि शंकराचार्य यांच्यात सुमारे तीन तास चर्चा आणि तणाव निर्माण झाला.