अभिनेत्री रसिका दुग्गाल तिच्या सोशल मिडियावर फार सक्रिय असते. मिर्झापूर या सिरीज नंतर देशभरात नावाजलेली अभिनेत्री रसिका सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तरुणांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
अभिनेत्री रसिका दुग्गालने सोशल मीडियावर शेअर केला नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media )
अभिनेत्री रसिका दुग्गालने तिच्या सोशल मिडिया हँडलवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने आकाशी रंगाचे नक्षीदार आउटफिट परिधान केले आहे. हा लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये हिरा ईमोजी टाकला असून या संपूर्ण फोटोशूटबद्दल संपूर्ण माहिती नमूद केली आहे.
तिच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री या कौतुकाच्या वर्षामध्ये संपूर्णपणे भिजून गेली आहे.
महत्वाची बाब म्हणजे Ed Sheeran आणि अरिजीत सिंहचे नवीन गाणे 'सफायर' या पोस्टसाठी वापरण्यात आले आहे.