रिंकू राजगुरू नेहमीच साधेपणातील सौंदर्य जपताना दिसते आणि आताही तिने अत्यंत साधी मात्र लक्ष वेधून घेणारी फॅशन केली आहे
रेड बॉर्डर आणि रेड प्रिंट असणारी ब्लॅक सिल्क साडी रिंकूने नेसली आहे आणि वेगवेगळ्या पोझ देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय
या साडीसह तिने स्लिव्हलेस आणि बॅक नॉट असणारा ब्लॅक ब्लाऊज परिधान केलाय आणि या ब्लाऊजलादेखील रेड बॉर्डर देण्यात आलीये
हातात लाल बांगड्या आणि कानात केवळ लहानसे टॉप्स घालत रिंकूने ही फॅशन पूर्ण केलीये. अगदी Girl next door असा तिचा लुक भासतोय
रिंकूने केस सोडून एका बाजूला घेतलेत आणि कपाळावर अत्यंत लहानशी टिकली लावत तिचा हा साडी लुक पूर्ण केलाय
नो मेकअप लुक करत रिंकूने केवळ काजळ, लायनर लावलं आहे आणि तिने लिपस्टिकही न लावता साधेपणात सौंदर्य जपण्याचे धडेच दिले असल्याचं दिसून येतंय