तेजस्विनीने गोल्डन बॉर्डर असणाऱ्या हिरव्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. नववधूचा हा लुक खूपस लोभसवाणा आणि मनमोहक दिसत आहे
तेजस्विनीने यासह प्रिंटेड ब्लाऊज घातला आहे. पारंपरिक आणि आधुनिकतेचा उत्तम मेळ साधत तिने हा लुक केलेला दिसून येत आहे
अगदी साधी हेअरस्टाईल करत तेजस्विनीने फक्त केसांना क्लिप लावत अर्धे केस मोकळे सोडले आहेत. तिच्या केसांची ब्राऊन शेड तिच्या सौंदर्यात अधिक भर घालतेय
हिरव्या साडीसह तेजस्विनीने हिरव्या बांगड्या आणि ऑक्सिडाईज्ड दागिने घातले आहेत आणि तिचा हा लुक खूपच तेजस्वी दिसत आहे
तेजस्विनीने घराच्या बाहेर वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. तर तिचा हा साधा आणि मनमोहक लुक चाहत्यांना खूपच आवडलाय
अगदी मिनिमल मेकअप आणि न्यूड मेकअप करत तेजस्विनीने हा लुक शेअर केलाय. नववधूचा चेहऱ्यावरील ग्लो हाच सगळीकडे चर्चेचा विषय झालाय