रोजच्या वापरात घाला १ ग्रॅम सोन्याचे मिनिमल आणि डेलिकेट डिजाईन्सचे मंगळसूत्र
हान, नाजूक आणि बारीक डिझाईन्सचे पेंडंट असलेले मंगळसूत्र घालण्यास महिला जास्त पसंती दर्शवतात. डायमंड पेंडेंट आणि काळ्या मण्यांची गोफण करून बनवलेले मंगळसूत्र अतिशय सुंदर दिसते.
मराठमोळ्या मंगळसूत्रामध्ये काळे मणी आणि नाजूक साजूक वाट्या कायमच असतात. त्यामुळे या डिझाईनचे मिनिमलिस्ट आणि आकर्षक मंगळसूत्र तुम्ही रोज घालू शकता.
हल्ली मिनिमलिस्ट दागिन्यांचा मोठा ट्रेंड आला आहे. साडी परिधान केल्यानंतर त्यावर काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घातले जाते. हे मंगळसूत्र मराठमोळा लुक देते.
साऊथ इंडियन डिझाईनमध्ये प्रामुख्याने काळे मणी आणि सुंदर लक्ष्मी पेंडेंट असते. लक्ष्मीच्या पेंडेंटमुळे मंगळसूत्र अतिशय उठावदार आणि सुंदर दिसते.
रोजच्या वापरासाठी तुम्ही या डिझाईनचे मंगळसूत्र सुद्धा खरेदी करू शकता. वेगवेगळ्या रंगाचे नाजूक साजूक पेंडंट मंगळसूत्राची शोभा वाढतो.