आलिया भटने राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी खास विंटेज लुक केल्याचे दिसून आले. तिचा हा लुक कोणत्याही रॉयल कार्यक्रमासाठी अप्रतिम ठरेल
सब्यासाचीने डिजाईन केलेली ही प्रिंटेड व्हाईट साडी आलियावर खूपच सुंदर दिसतेय. तर आलियाने या साडीसह डीप व्ही नेक गळ्याचा ब्लाऊज घातला असून अगदी जुन्या हिरॉईनसारखा लुक ठेवण्याचा प्रयत्न केलाय
हेअरस्टाईलदेखील तिने अगदी साधी ठेवली असून केस मोकळे सोडले आहेत आणि अगदी हलकेसे कर्ल केसांना दिले आहेत, ज्यामुळे तिच्या लुकमध्ये अधिक सौंदर्याची भर पडली आहे
या साडीसह आलियाने मोती आणि पाचूचा नाजूकसा चोकर गळ्यात घातला असून बाकी कोणतेही दागिने घातले नाहीयेत. मात्र तरीही तिचा हा लुक अत्यंत रॉयल आणि नजर न हटण्यासारखाच दिसतोय
आलियाने हातात पांढरे गुलाब घेऊन पोझ देत काही फोटो काढले आहेत जे एखाद्या राजघराण्यातील फोटोसारखे भासत आहेत. आलियाचा हा लुक क्लासी दिसत आहे
अत्यंत मिनिमल आणि न्यूड मेकअप आलियाने केला असून केवळ फाऊंडेशन, काजळ, आयलायनर, हायलायटर आणि न्यूड लिपस्टिकचा वापर केलाय. तिच्या चाहत्यांनी तर कमेंट्सचा सोशल मीडियावर वर्षाव केलाय