चवीबरोबरच पौष्टिकताही... हेल्दी इंडियन ब्रेकफास्ट पर्याय
पोहा – कमी तेलात केलेला, त्यात शेंगदाणे, मटार, कांदा घालून पौष्टिकता वाढते. सकाळच्या नाश्त्यासाठीचा हा एक लोकप्रिय पर्याय आहे.
सकाळचा नाश्ता हलका, पौष्टिक आणि संतुलित असावा. कमी तेलात बनवलेले, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ वेळेवर खाल्ल्याने ऊर्जा, पचन सुधारते. यामुळे आरोग्यही निरोगी राहते ज्यामुळे नेहमी सकाळच्या नाश्त्याला हेल्दी पर्यायच निवडावा.
थालिपीठ – विविध पिठांपासून बनवलेले, त्यात हिरव्या भाज्या आणि मसाले टाकून बनवण्यास एक एक चवदार टेस्ट मिळते. दहीसोबत खाल्ल्यास याला आणखीनच पौष्टिकता मिळते.
इडली-सांबार – सर्वांच्या आवडीची वाफवलेली इडली तेलकट नसते, सांबारसोबत प्रोटीन आणि फायबर मिळते.
उपमा – रव्याचा उपमा हा हलका आणि पचायला सोपा आहे. यात भाज्या घालून याला अधिक हेल्दी बनवता येते.