Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

Chicken Paratha Recipe : तोच तोच बटाट्याचा पराठा काय खाताय? यंदाच्या नाश्त्याला घरी बनवा लज्जतदार आणि खमंग तुपात भाजलेला चिकन पराठा. सकाळच्या नाश्त्यासाठी हा प्रोटीन रिच पराठा तुम्हाला दिवसभर उर्जावान ठेवण्यास मदत करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 11, 2026 | 09:38 AM
बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

Follow Us
Follow Us:
  • आजवर अनेक प्रकारचे पराठे आपण खाल्ले असतील.
  • पण तुम्ही कधी चिकनचा पराठा खाल्ला आहे का?
  • मसालेदार चिकनच्या स्टफिंगने भरलेला हा पराठा चवीला फार छान लागतो.
पराठा म्हटले की आपल्याला लगेचच गरमागरम, तूप लावलेला आणि खमंग चवीचा पदार्थ आठवतो. आपण आजवर बटाटा, पनीर, मेथी असे अनेक प्रकारचे पराठे खाल्ले असतील; पण जर तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल, तर चिकन पराठा हा एक भन्नाट आणि पौष्टिक पर्याय ठरतो. हा पराठा खास करून नाश्ता, दुपारचे जेवण किंवा संध्याकाळच्या वेळेसही खूप छान लागतो.

Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, विकतंच कशाला? घरीच बनवा कुरकुरीत अगदी बाजारासारखी खमंग ‘मठरी’

चिकनमधील प्रथिने आणि मसाल्यांची खमंग चव यामुळे हा पराठा केवळ पोट भरण्यासाठीच नव्हे, तर जिभेचेही समाधान करतो. घरात उरलेले शिजवलेले चिकन असो किंवा खास प्रसंगासाठी काहीतरी वेगळे बनवायचे असो, चिकन पराठा प्रत्येक वेळी योग्य ठरतो. दही, लोणचे किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत दिला तर याची चव आणखी खुलून येते. चला तर मग, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चिकन पराठा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

 साहित्य

चिकन स्टफिंगसाठी:

  • उकडलेले किंवा शिजवलेले चिकन (कुस्करलेले) – 1 कप
  • कांदा (बारीक चिरलेला) – 1
  • हिरवी मिरची (बारीक चिरलेली) – 1-2
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर (चिरलेली) – 2 टेबलस्पून
  • तेल – 1 टेबलस्पून
पराठ्यासाठी:
  • गव्हाचे पीठ – 2 कप
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तूप किंवा तेल – पराठे भाजण्यासाठी
साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? मग मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी

 कृती

  • सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या, नंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला.
  • कांदा हलका गुलाबी झाला की त्यात चिकन, सर्व मसाले आणि मीठ घालून 2–3 मिनिटे परतून घ्या.
  • शेवटी कोथिंबीर घालून स्टफिंग थंड होऊ द्या.
  • गव्हाच्या पिठात मीठ घालून मऊ कणीक मळून घ्या.
  • कणकेच्या गोळ्यात चिकन स्टफिंग भरून पराठा लाटा.
  • गरम तव्यावर तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
  • गरमागरम चिकन पराठा दही, हिरव्या चटणी किंवा कांद्याच्या कोशिंबिरीसोबत सर्व्ह करा.
  • हा पराठा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल.

Web Title: How to make chicken paratha at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • chicken
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
1

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
2

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
3

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
4

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.