टेलर स्विफ्टने ट्रॅव्हिस केल्सेशी केला साखरपुडा, अभिनेत्याने हटके अंदाजात केले प्रपोज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टेलर स्विफ्ट आणि ट्रॅव्हिस केल्से यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि बागेत काढलेले अनेक सुंदर फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये, ट्रॅव्हिस एका गुडघ्यावर बसून टेलरला प्रपोज करताना दिसला आहे.
तर, दुसऱ्या फोटोमध्ये, टेलरच्या हिऱ्याच्या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांनी एका मजेदार कॅप्शनमध्ये लिहिले, "तुमचे इंग्रजी शिक्षक आणि जिम शिक्षक लग्न करत आहेत."
२०२३ मध्ये जेव्हा ट्रॅव्हिस टेलरच्या इरास टूर कॉन्सर्टला गेला होता तेव्हा टेलर स्विफ्ट आणि ट्रॅव्हिस केल्स यांची भेट झाली. ट्रॅव्हिस टेलरला मैत्रीचे ब्रेसलेट देऊ इच्छित होता पण त्याला संधी मिळाली नाही.
टेलर स्विफ्टने ट्रॅव्हिस केल्सेशी केला साखरपुडा, अभिनेत्याने हटके अंदाजात केले प्रपोज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आता त्यांच्या साखरपुड्याने चाहत्यांना आनंद झाला आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या लग्नाच्या बातमीची वाट पाहत आहे. तसेच आता या दोघांच्या लग्नाचे फोटो कधी समोर येतायत त्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.