Android वरून iPhone वर स्विच करण्याचा विचार करताय? थांबा, वाचा या महत्त्वाच्या टिप्स
Android वरून iPhone वर डेटा ट्रांसफर करण्यााठी Apple चे 'Move to iOS' अॅप उपलब्ध आहे. परंतु हे प्रत्येक वेळी 100% स्मूद ट्रांसफरची हमी देत नाही. कॉल लॉग, अॅप डेटा, काही फाइल फॉरमॅट किंवा कस्टम फोल्डर पूर्णपणे ट्रान्सफर केले जाऊ शकत नाहीत.
अँड्रॉइड फोनवर, व्हॉट्सअॅप चॅट्सचा बॅकअप गुगल ड्राइव्ह वर घेतला जातो, तर आयफोनमध्ये आयक्लॉड वापरतात.
अँड्रॉइडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कस्टमायझेशन. तुम्ही तुमच्या आवडीनुसार होम स्क्रीन, विजेट्स, अॅप आयकॉन सर्वकाही बदलू शकता. तर आयफोनमध्ये हे स्वातंत्र्य खूपच मर्यादित आहे.
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये तुम्हाला चार्जर बॉक्समध्ये मिळतो आणि अॅक्सेसरीज देखील स्वस्त असतात. तर आयफोनमध्ये चार्जर, केस, एअरपॉड्स इत्यादी स्वतंत्रपणे खरेदी करावे लागतात.
जर तुम्हाला सहजपणे फाइल्स शेअर करण्याची सवय असेल (जसे की ब्लूटूथ, झेंडर किंवा SHAREit द्वारे), तर आयफोनवर या गोष्टी मर्यादित आहेत. आयफोनमध्ये एअरड्रॉप आहे, पण ते फक्त अॅपल उपकरणांमध्येच काम करते.