पिवळसर, काळ्या दातांवर आणा सफेदी; दातांना चमकवण्यासाठी करा या फळांचे सेवन
पपईचे सेवन आरोग्यासाठी तर फायदेशीर ठरतेच शिवाय यामुळे दातांवरील डाग देखील दूर होतात.
लालचुटुक डाळिंबामध्ये असे काही पोषक घटक असतात जे हिरड्यांमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात.
नाशपाती फळाचे सेवन तोंड स्वच्छ करण्यास मदत करते.
यासहच तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याचा समावेश करू शकता. यामधील व्हिटॅमिन सी हिरड्या मजबूत करण्यास मदत करतात.
दातांवर सफेदी आणण्यासाठी सफरचंदाचे सेवन फायद्याचे ठरते. यामुळे दातांवर जमा होणारा प्लाक कमी होतो.