500 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले, प्रभू रामांची अयोध्या नगरी तब्बल 28 लाख दिव्यांनी उजळली!
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभू रामांच्या रामनगरीत म्हणजेच अयोध्येत दिपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्यानगरीत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले. 500 वर्षांनी मंदिर उभे राहिल्यानंतर अयोध्यावासीयांनी ही पहिलीच दिवाळी साजरी केली आहे.
यावेळी तब्बल 28 लाख दिव्यांनी अयोध्यानागरी उजळली होती. शरयूनदीच्या किनारी 55 घाटावर हा दिपोत्सव साजरा करण्यात आला.
मोठ्या उत्साहात, आनंदात या सोहळ्यात अयोध्यावासी सहभागी झाले होते.
अयोध्येत दीपोत्सवानंतर लेझर लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे यामध्ये प्रकाश आणि चकाकी यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला.
हा लेझर लाईट शो हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. हा शो पाहण्यासाठी हजारो लोक अयोध्येत पोहोचले. लेझर लाईट शोचा मुख्य कार्यक्रम सरयूच्या काठावर झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या लेझर लाईट शोचा आनंद लुटला.