फोटो सौैजन्य: iStock
कमी झोप: कमी झोप घेतल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन त्वचेमध्ये सुरकुत्या आणि थकवा दिसू लागतो. यामुळे आपले आरोग्य देखील बिघडते.
नाश्ता न करणे: सकाळी उपाशी राहिल्यामुळे मेटाबोलिजम मंदावतो, जे शरीराच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम करतं. म्हणूनच सकाळी नाश्ता करणे फार महत्वाचे आहे.
व्यायामाची कमी: सकाळी थोडे स्ट्रेचिंग किंवा व्यायाम न केल्याने हाडे आणि स्नायू कमकुवत होतात.म्हणूनच रोज किमान अर्धा तास तरी आपण व्यायाम करणे गरजेचे आहे.
अति कॅफीन: चहा किंवा कॉफीचे अति सेवन शरिरावर ताण आणते आणि झोपेच्या चक्रावर नकारात्मक परिणाम करतो. यामुळे आपल्या झोपेचे टाइमटेबल बदलते.
पाणी न पिणे: सकाळी पाणी न प्यायल्यामुळे शरीराची हायड्रेशन कमी होते, ज्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे.