Tejashree Jadhav And Roshan Singh Wedding Photos
मराठी अभिनेत्री तेजश्री जाधवच्या गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक लग्नाच्या विधी पार पडल्यानंतर ते आज लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नबंधनात अडकल्यानंतर आणि सप्तपदी घेत असतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
व्हायरल फोटोंमध्ये दोघांनीही मराठमोळा अंदाज करुन लग्नगाठ बांधली आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये, तेजश्रीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, लाईट ब्लू डिझायनिंग ब्लाऊज आणि मराठमोळा साज असा तिच्या लग्नात लूक केलेला होता. तर, तेजश्रीच्या नवऱ्याने लग्नामध्ये, तिला मॅचिंग लूक केलेला होता.
रोहन सिंगने लग्नामध्ये, मराठमोळा लूक केलेला होता. त्याने लग्नामध्ये, ऑफ व्हाईट कुर्ता आणि ब्लू कलरची धोती आणि दुपट्टा असा लूक केलेला होता. दोघेही लग्नामध्ये पारंपारिक लूकमध्ये होते. तेजश्रीने १४ मार्च २०२४ रोजी साखरपुडा केला होता. साखरपुड्याच्या १० महिन्यांनंतर तेजश्री आणि रोहनने लग्नगाठ बांधली आहे.
तेजश्री जाधव आणि रोहन सिंगच्या लग्नाच्या आधीच्या विधींना १९ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. प्री- वेडिंग, केळवण, मेहेंदी आणि हळद या सर्व इव्हेंटनंतर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेजश्री आणि रोहनच्या लग्नासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
तेजश्री आणि रोहनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. त्याशिवाय, प्रवीण तरडेच्या 'बलोच' चित्रपटातून अभिनेत्री तेजश्री जाधव प्रकाशझोतात आलेली होती. खरंतर, तेजश्री जाधवने सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या ‘अकिरा’चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.