लग्नसराईत नवरीच्या पायात शोभून दिसतील 'या' सुंदर चांदीच्या जोडव्या
तुम्हाला जर जास्त मोठ्या आकाराच्या जोडव्या नको असतील तर तुम्ही या डिझाईन्सच्या सुंदर जोडव्या घालू शकता. पायांमध्ये नाजूक साजूक जोडव्या सुंदर दिसतात.
पूर्वीच्या काळी महिलांच्या पायात मासोळी हा चांदीचा दागिना परिधान करत होत्या. मासोळ्या पायांच्या मधल्या बोटात घातल्या जातात.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये दागिने परिधान करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी सोन्याच्या जोडव्या घालण्याची पद्धत आहे.
महाराष्ट्रीयन नवरीच्या पायात प्रामुख्याने या डिझाईन्सच्या जोडव्या असतात. या पद्धतीच्या जोडव्या पायांमध्ये अतिशय भरीव आणि उठावदार दिसतात.
फुलाच्या आकाराच्या जोडव्या पायात सुंदर दिसतात. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फुलांच्या जोडव्या तयार करून घेऊ शकता.