जास्वंदीच्या फुलांचा चहा पिण्याचे फायदे
जास्वंदीच्या फुलांमध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी ही फुले मदत करतात. या फुलांचा चहा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा चहा पिऊ शकता. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा.
जास्वंदीच्या फुलात आढळून येणारे अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासायटिक गुणधर्म जिवाणू, बुरशीजन्य आणि इतर अनेक प्रकारचे शारीरिक संसर्ग टाळण्यासाठी मदत करतात.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा. ॲसिडिटी किंवा अपचनची समस्या उद्भवत नाही आणि आरोग्य निरोगी राहते.
शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्याचे काम जास्वंदीचा चहा करतो. हा चहा बनवण्यासाठी गरम पाण्यात जास्वंदीची फुले उकळवा. त्यानंतर त्यातील फुले गाळून त्यात मध मिक्स करून चहाचे सेवन करा.