सॅलड खाण्याचे फायदे
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नियमित सॅलड खातात.सॅलड खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही. तसेच पोटही भरलेले राहते. त्यामुळे दुपारच्या आहारात किंवा नाश्त्यामध्ये तुम्ही सॅलड खाऊ शकता.
सॅलडमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. रोजच्या आहारात फायबर युक्त भाज्यांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पालक, गाजर, ब्रोकोली, टोमॅटो आणि लाल सिमला मिरची इत्यादी भाज्यांचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. या सर्व भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येते.
गाजर, पालेभाज्या, बीटरूट इत्यादी भाज्यांचे सॅलड बनवून खाल्यास स्नायूंच्या वाढ मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित सॅलडचे सेवन करावे.
सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या आहारासोबत तुम्ही नियमित सॅलड खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये तुम्ही भाज्यांसह, अंड, फळे, पनीर इत्यादी पदार्थांचा सुद्धा वापर करू शकता.