उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ
अंड हा नाशवंत पदार्थ आहे. त्यामुळे शिळी अंडी खाणे शरीरासाठी चांगले नाही. उकडवून ठेवलेली अंडी योग्य प्रकारे स्टोर करून ठेवल्यास ती व्यवस्थित टिकून राहतात.
शिजवलेल्या अंड्यांवरील कवच न काढता फ्रिजमध्ये ठेवल्यास ७ दिवसांपर्यंत अंडी व्यवस्थित टिकून राहतील. ७ दिवस तुम्ही अंडी खाऊ शकता.
अंड्यावर असलेले कवच अंड्याला बॅक्टेरियापासून रक्षण करते. त्यामुळे अंडी जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहतात. अंड्यावरील कवच काढू टाकल्यास अंडी खराब होण्याची शक्यता असते.
कवच काढून ठेवलेली अंडी फ्रिजमध्ये २ ते ३ दिवस व्यवस्थित टिकून राहतात. तसेच अंडी कायमच हवा बंद झाकणाच्या डब्यात ठेवावी.
शिजवून घेतलेली अंडी घरातील वातावरणात ६ ते ७ तासांहून जास्त काळ व्यवस्थित राहत नाही. अंड खराब होण्याची शक्यता जास्त असते. अंड्यातून तीव्र दुर्गधी किंवा अंड्याचा रंग बदलल्यास अंड्यांचे अजिबात सेवन करू नये.