कोकणात हिवाळ्यात 'या' ठिकाणी जा. (फोटो सौजन्य - Social Media)
‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखलं जाणारं दापोली हिवाळ्यात थंड हवेसाठी उत्तम आहे. येथे मुरुद, हरणे आणि कर्दे बीचवर फॅमिली पिकनिकचा खास आनंद घेता येतो.
गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरासोबतच गणपतीपुळ्यातील निळाशार समुद्र किनारा पर्यटकांना भुरळ घालतो. हिवाळ्यात इथलं हवामान मन मोहून टाकणारं असतं.
कोरल आयलंड्स, सिंधुदुर्ग किल्ला आणि स्वादिष्ट सीफूडसाठी प्रसिद्ध मालवण हिवाळ्यात पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे स्नॉर्केलिंग आणि स्कूबा डायव्हिंगचाही आनंद घेता येतो.
स्वच्छ समुद्रकिनारा आणि नारळाच्या झाडांनी वेढलेलं गुहागर हे शांतता शोधणाऱ्यांसाठी योग्य ठिकाण आहे. हिवाळ्यातील सूर्यास्त येथे पाहण्यासारखा असतो.
सह्याद्री पर्वतरांगेत वसलेलं आंबोली हे हिल स्टेशन हिवाळ्यात धुक्याने आच्छादित असतं. थंड हवामान, धबधबे आणि हिरवळ यामुळे हे ठिकाण फॅमिली पिकनिकसाठी आदर्श आहे.