Tech Tips: वारंवार डिस्कनेक्ट होतंय ब्लूटूथ? 'या' कारणांमुळे येऊ शकते समस्या
स्मार्टफोन आणि गॅझेट्समधील अंतर हे ब्लूटूथ वारंवार डिस्कनेक्ट होण्याचे सर्वात मुख्य कारण आहे. जर तुमचा फोन कनेक्टेड डिव्हाईसपासून फार दूर असेल तर वारंवार ब्लूटूथ कनेक्शन तुटण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
स्मार्टफोन आणि कनेक्टेड गॅझेटमध्ये भिंत किंवा दुसरे कोणते अडथळे असतील तर ब्लूटूथ सिग्नलवर परिणाम होऊ शकतो.
तुमच्या आजूबाजूला अनेक वायरलेस डिव्हाईस चालू असल्यास ब्लूटूथ कनेक्शनमध्ये समस्या येऊ शकते. ब्लूटूथ 'फ्रिक्वेन्सी-हॉपिंग' तंत्रज्ञानाचा वापर करते, जे सतत वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सींदरम्यान स्विच करत असते.
जर तुमचे ब्लूटूथ गॅझेट जसे ईअरबड्स किंवा स्पीकर दुसऱ्याच स्मार्टफोनला कनेक्ट झाले तर समस्या निर्माण होऊ शकते. यावरील उपाय म्हणजेच ब्लूटूथ डिव्हाईसमधील नको असलेले कनेक्शन हटवा.
ब्लूटूथ डिव्हाईसची बॅटरी खूप कमी असेल तर कनेक्शनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. कारण बॅटरी कमी असल्यास डिव्हाईसचे सिग्नल कमकुवत होऊ शकतात आणि डिव्हाईस वारंवार डिस्कनेक्ट होऊ शकते.
स्मार्टफोनच्या ब्लूटूथ कनेक्टेड डिव्हाईस यादीमधून अशी नावे हटवा, ज्या डिव्हाईसचा वापर तुम्ही करत नाही.