बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक अनन्या पांडे आहे. अनन्या पांडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकतीच दिवाळीचे निमित्त साधत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
Ananya Panday Saree
बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असणारी स्टारकिड म्हणजे अनन्या पांडे. काही दिवसांपूर्वी तिचा 'CTRL' चित्रपट रिलीज झाला. तिचा हा चित्रपट 'नेटफ्लिक्स'वर रिलीज झाला होता. तिने चित्रपटात केलेल्या अभिनयाचे कौतुक झाले होते. सध्या अनन्या इन्स्टाग्रामवर नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
अनन्याने दिवाळी स्पेशल फोटोशूट केला आहे, या शेअर केलेल्या फोटोजमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
स्टायलिश रेड साडी, फॅन्सी ब्लाऊज कॅरी करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे. व्हाईट डायमंड नेकलेस, बांगड्या आणि सिंपल लूक असा अभिनेत्रीने संपूर्ण लूक केलेला आहे. या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
ग्लॉसी मेकअप, पिंक न्यूड लिपस्टिक आणि स्टायलिश हेअर्स असा लूक करून अनन्या पांडेने सुंदर फोटोशूट केला आहे. शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये अनन्याने एका पेक्षा एक हटक्या अंदाजात फोटोशूट केले आहे.
अनन्याचा दिवाळी स्पेशल लूक चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरला आहे. हे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लाखो चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.