सौजन्य फोटो - सोशल मिडीया
ही धक्कादायक घटना नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ग्रंथाली आकाश वर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सुनेचे नाव असून, तिची सासू राधा वर्मा यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राधा वर्मा यांना शिर्डी येथे दर्शनासाठी जायचे होते. प्रवासाचा खर्च आणि परिधान करण्यासाठी दागिने काढायला त्यांनी जेव्हा कपाट उघडले, तेव्हा कपाटात ठेवलेले ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये ३० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, १३ ग्रॅमचा नेकलेस आणि १० ग्रॅमचे इतर दागिने असा सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज होता.
आयुष्यभर कष्टाने जपलेले दागिने अचानक गायब झाल्यामुळे सासूला प्रचंड मानसिक धक्का बसला. यापूर्वीही सुनेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल असल्याने सासू राधा यांना तिच्यावरच संशय आला. सासू-सासऱ्यांनी जेव्हा सुनेकडे याबाबत कडक विचारणा केली, तेव्हा तिने दागिने चोरल्याची कबुली दिली व ते लवकरच परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वारंवार मागूनही तिने दागिने परत न केल्याने अखेर सासूने पोलिसांत धाव घेतली.
हेही वाचा: मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल
शांतीनगर पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपी सुनेची कसून चौकशी केली. या चौकशीत तिने सासूचे दागिने चोरून विकल्याचे आणि त्यातून आलेले पैसे खर्च करून ॲपल कंपनीचा आयफोन खरेदी केल्याची धक्कादायक कबुली दिली. सुनेचा हा पराक्रम ऐकून पोलीसही चक्रावून गेले. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आरोपी सुनेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस आता विकलेले दागिने हस्तगत करण्याचा आणि पुढील कायदेशीर कारवाईचा तपास करत आहेत.
Ans: हा प्रकार नागपूरमधील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
Ans: सुनेने सुमारे २,५०,००० रुपये किमतीचे एकूण ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले होते.
Ans: चोरीचे दागिने विकून आलेल्या पैशांतून सुनेने ॲपल कंपनीचा आयफोन खरेदी केला.






