दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून अभिनेत्रीने बदलले नाव, स्टारडम मिळताच सोडली इंडस्ट्री; आता करणार कंगनाच्या चित्रपटातून डेब्यू
आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिने शाहरुख खानच्या 'परदेस' चित्रपटातून पदार्पण केले. फिल्मी दुनियेत प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने आपले नावही बदलले. या चित्रपटाने तिला विशेष प्रसिद्धी दिली. काही वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यानंतर अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दूर गेली.
पण आता ती पुन्हा एकदा कंगनाच्या आगामी चित्रपटातून दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी आहे. आता महिमा कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटातून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.
महिमा या चित्रपटात पुपुल जयकरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूकही समोर आला आहे. येत्या ६ सप्टेंबरला 'इमर्जन्सी' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
फक्त अभिनयामुळेच चर्चेत न राहता महिमा खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. लग्न झाल्यानंतर काही वर्षातच तिचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर अभिनेत्रीला कॅन्सरसारख्या आजाराचे निदान झाले.
महिमा चौधरीने २००६ मध्ये आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. पण त्यांचे लग्न केवळ ७ वर्षे टिकले. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
महिमाचे खरे नाव रितू चौधरी आहे. 'परदेस'चे दिग्दर्शक सुभाई घई यांनी महिमाला सल्ला दिला होता की, 'एम' हे अक्षर त्यांच्या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रींसाठी लकी आहे. दिग्दर्शकाच्या सल्ल्यानंतर अभिनेत्रीने तिचे नाव रितूवरून बदलून महिमा केले.
१९९९ मध्ये 'दिल क्या करे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान महिमा चौधरीचा भीषण अपघात झाला होता. बंगळुरूमध्ये तिची कार एका ट्रकला धडकली होती. या अपघातात तिच्या चेहऱ्यावर अनेक काचेचे तुकडे घुसले होते.