
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत, इमरान हाश्मीने लव्हरबॉय ते खलनायक ते गंभीर नायक अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या पडद्यावरच्या भूमिकांमुळे त्याला चांगली तयारी करता आली, परंतु प्रत्यक्ष जीवनात पडद्यामागे घडणाऱ्या घटनांसाठी तो पूर्णपणे तयार नव्हता. २०१४ मध्ये, एका घडणेमुळे त्याचे आयुष्य बदलले. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत, इमरान हाश्मीने त्याच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक क्षणाबद्दल सांगितले. जेव्हा त्याला कळले की त्याचा धाकटा मुलगा अयानला कर्करोग झाला आहे. तो क्षण अजूनही त्याला त्रासदायक वाटतो.
इमरान हाश्मीने त्याच्या आयुष्यातील सर्वात हृदयद्रावक क्षणांबद्दल सांगितले, ज्या दिवशी त्याचे जग कायमचे बदलले. त्याने आठवले की एक साधी दुपार अचानक पालकांच्या सर्वात वाईट स्वप्नात कशी बदलली. रणवीर अलाहाबादियाशी झालेल्या संभाषणादरम्यान, इमरान म्हणाला, “माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ म्हणजे २०१४ मध्ये माझा मुलगा आजारी पडला. आणि मी तो काळ शब्दात वर्णनही करू शकत नाही. तो पाच वर्षे चालला. त्या दुपारच्या घटनेने माझे आयुष्य बदलले.’ असे तो म्हणाला.
दहशत अन् भीतीने भरलेले चेहरे, आणखी एक थरारक कथेची झलक; The Kerala Story 2 चे मोशन पोस्टर रिलीज
अभिनेत्याचे १२ तासांत जग बदलले
“१३ जानेवारी रोजी आम्ही ब्रंचसाठी बाहेर गेलो होतो. आम्ही आमच्या मुलासोबत पिझ्झा खात होतो, तेव्हाच पहिलं लक्षण दिसलं. त्याच्या लघवीत रक्त आलं होतं. पुढील तीन तासांत आम्ही डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, ‘तुमच्या मुलाला कर्करोग झाला आहे. उद्याच त्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यानंतर केमोथेरपी सुरू करावी लागेल.’ अवघ्या १२ तासांत माझं संपूर्ण जग उलटून गेलं.” असे अभिनेता म्हणाला.
इमरान हाश्मी यांनी सांगितले की तो काळ अधिक कठीण ठरण्याचं कारण म्हणजे आयुष्य पुन्हा एकदा सामान्य आणि स्थिर वाटू लागलं होतं. सर्व काही सुरळीत आणि चांगलं चाललं असल्यासारखं भासत होतं, पण अचानक सगळंच बदलून गेलं. अभिनेता पुढे म्हणाला, “असं वाटत होतं की आयुष्यात एक सुवर्णकाळ सुरू झाला आहे. शेवटी सगळं जुळून आलं आहे, असं वाटत होतं. मला आयुष्यावर नियंत्रण मिळाल्यासारखं भासत होतं. पण अचानक एक मोठा धक्का बसतो आणि सगळं उलटून जातं. असं कधीही घडू शकतं.” असे त्याने सांगितले.
पाच वर्षांत इमरानचे बदलले आयुष्य
इमरानने सांगितलं की पुढील पाच वर्षे त्याचं आयुष्य रुग्णालयात जाणं, विविध उपचार घेणं आणि सतत काळजीत राहणं यामध्येच गेलं. त्या काळाने आयुष्यात नेमकं काय खरंच महत्त्वाचं आहे, हे त्याला शिकवलं. या अनुभवामुळेच अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या पालकांना आधार मिळावा, यासाठी त्याने एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा घेतली. आज त्याचा मुलगा पूर्णपणे निरोगी असून तो बरा झाला आहे. त्यामुळे इमरान त्या काळाला आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा मानतो.