मोत्याच्या कानातल्यानी वाढवा साडी- ड्रेसची चमक! दिवाळीसाठी खरेदी करा 'या' डिझाईनचे मोती कानातले
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिलांच्या कानात तुम्ही बुगड्या पहिल्या असतील. पण बदलत्या फॅशन युगात मोत्याच्या देखील बुगड्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
रोजच्या वापरात अनेक महिला मोत्याचे कानातले घालतात. बाजारात रंगीत मोत्यांचे सुद्धा कानातले उपलब्ध आहेत. डिझायनर साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर रंगीत मोती सुंदर दिसतील.
बाजारात २०० रुपयांपासून ते अगदी ७००० रुपये किमतींपर्यंत मोत्याचे झुमके आणि इतर डिझाईनचे कानातले मिळतात. त्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये तुम्ही या डिझाईनचे कानातले ट्राय करू शकता.
देवी सरस्वतीच्या आकारातील मोत्याचे कानातले कांजीवरम साडीवर खुलून दिसतील. या दागिन्यांना टेम्पल ज्वेलरी असे सुद्धा म्हणतात.
सर्वच महिलांना मोत्याचे झुमके घालायला खूप जास्त आवडतात.पैठणी किंवा नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर मोत्याचे झुमके घातले जातात. यामुळे मराठमोळा लुक दिसतो.