सदर हॉस्पिटल कोडरमा येथे असलेल्या जिल्हा आयुष विभागाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात कुमार यांनी एका हिंदी संकेतस्थळाला माहिती दिली की, बदलत्या ऋतूमध्ये ऋतूसाठी योग्य नसलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केले जाते, तेव्हा घशात संसर्ग होतो आणि लोकांना टॉन्सिल वाढण्याची समस्या सुरू होऊन त्रास होतो
त्यांनी सांगितले की दोन-तीन दिवस जुने अन्न, शिळी भाकरी किंवा इतर खाद्यपदार्थ तुम्ही खात असाल तर अशा समस्या अधिक वाढीला लागतात
त्यांनी सांगितले की या समस्येपासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे थंडीच्या दिवसात नियमितपणे गरम पाण्याचे सेवन करणे, अशी समस्या उद्भवल्यास गरम पाण्याने तुम्ही गुळण्या कराव्यात
समस्या वाढल्यास आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा भाग म्हणून 10 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम मिरी, 40 ग्रॅम वेलची, 80 ग्रॅम वंशलोचन आणि 160 ग्रॅम साखरेची मिठाई पावडरमध्ये तयार करून सुती कापडात गाळून घ्यावी. त्यानंतर ही तयार पावडर तुळशीच्या पानात किंवा बाकासच्या पानात मिसळून चाटल्यास खूप आराम मिळतो
त्यांनी सांगितले की जर हे घटक कोणत्याही भागात सहज उपलब्ध नसतील तर लोक या घटकांच्या मिश्रणापासून तयार केलेले आयुर्वेदिक औषध सितोपलादी वापरू शकतात
तसंच आपल्या शारीरिक प्रकृतीनुसार आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचा उपयोग करावा असंही यावेळी डॉक्टरांनी सांगितले. मात्र तुम्ही कोमट पाण्याच्या गुळण्या नियमित करणे नक्कीच फायदेशीर ठरते