Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती

अर्थसंकल्प 2026 फक्त कर आणि महागाईपुरता मर्यादित नसून तो थेट तुमच्या आरोग्याशी जोडलेला आहे. सरकारी रुग्णालयांपासून औषधांच्या किमतींपर्यंत या बजेटमधील निर्णय सामान्य माणसाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2026 | 12:19 PM
Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती

Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:
  • अर्थसंकल्प आपल्या रोजच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करत असतं.
  • हेल्थ बजेट वाढल्यास सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होते.
  • बजेट वाढल्यास अधिक आजारांचा समावेश होऊन मोफत किंवा परवडणारे उपचार मिळण्याची शक्यता वाढते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आपल्या देशाचा नवीन २०२६ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. जेव्हा जेव्हा देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो तेव्हा लोक कर, महागाई आणि पगार या गोष्टींवर अधिक भर देतात. तथापि तथापि तुम्हाला माहिती आहे का? देशाचा अर्थसंकल्प हा तुमच्या आहारापासून ते आरोग्यापर्यंत आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर थेट परिणाम करतो. केंद्र सरकारचे अर्थसंकल्प देशातील रुग्णालये कशी चालतील, उपचार किती सुलभ असतील, औषधे परवडणारी असतील की महाग असतील आणि आजारपणात सामान्य माणसाला किती आर्थिक दिलासा मिळेलहे देखील ठरवते. म्हणूनच हे अर्थसंकल्प तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आरोग्याशी संबंधित आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. चला तर मग अर्थसंकल्प आपल्या आरोग्याशी कसा संबंधित आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात होणार रेल्वे सुधारणा संबंधित 5 मोठे बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा

हेल्थ बजेट आणि सरकार रुग्णालये

सर्वसाधारण अर्थसंकल्पात आरोग्य मंत्रालयाला देण्यात येणाऱ्या निधीवरून सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या वाढेल की नाही, नवीन उपकरणे आणली जातील की नाही आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचतील की नाही हे निश्चित केले जाते. आरोग्य अर्थसंकल्पात वाढ केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये मजबूत होतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत उत्तम उपचार मिळतात. अर्थसंकल्पातील कपातीचा थेट परिणाम उपचारांच्या गुणवत्तेवर आणि उपलब्धतेवर होतो.

आयुष्मान भारत आणि आरोग्य विमा योजना

आयुष्मान भारत सारख्या योजनांची व्याप्ती वाढणार की नाही हे देखील नव्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. या योजनेअंतर्गत लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सुविधा आणि उपचार पुरवले जातात. या योजनेसाठी जास्त बजेट वाटप केल्यास अधिक आजारांना कव्हर मिळेल आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांची दारे उघडतील, ज्यामुळे सामान्य जनतेचा खिशावरील भार कमी होईल.

औषधे आणि उपचारांचा खर्च

औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य तंत्रज्ञानावर किती प्रमाणात कर आणि जीएसटी लावावा याचाही निर्णय या बजेटमध्ये केला जातो. हा टॅक्स कमी केल्याने औषधांची आणि उपचारांची किंमत कमी होऊ शकते. दरम्यान, देशांतर्गत औषध आणि वैद्यकीय उपकरण उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास देशात परवडणारे आणि दर्जेदार उपचार उपलब्ध होण्याची शक्यता असते.

पोषण, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता

आपले आरोग्य हे फक्त रुग्णालयांबद्दल नाही तर आपल्या दैनंदिन जीवनावरही अवलंबून आहे. बजेटमध्ये पोषण कार्यक्रम, मिड डे मिल, अंगणवाड्या, स्वच्छ भारत अभियान आणि जल जीवन अभियानासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी मुले, महिला आणि वृद्धांचे आरोग्य निश्चित केले जातात. कुपोषण, घाणेरडे पाणी आणि खराब स्वच्छता यामुळे आरोग्य धोक्यात येत असते अशात या गोष्टींचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

‘एआय’ जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम

मानसिक आरोग्य आणि जीवनशैलीचे आजार

सध्या ताणतणाव, नैराश्य, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. अर्थसंकल्पात मानसिक आरोग्य सेवा, समुपदेशन, डिजिटल आरोग्य प्लॅटफॉर्म आणि प्रतिबंधात्मक कार्यक्रमांसाठी निधी वाढवायचा की नाही ते निश्चित होते. हा निधी वाढल्यास समस्या सोडविण्यास मदत होऊ शकते. मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत असून यावरून अर्थसंकल्पात याकडे किती लक्षपूर्वक पाहिले जात आहे ते जाणून घेता येते.

वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य कर्मचारी

नवीन मेडिकल महाविद्यालये, , नर्सिंग संस्था आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या स्थापनेसाठी अर्थसंकल्पात निधी निश्चित केला जातो. यामुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यास मदत होते. देशात प्रशिक्षित डॉक्टर असल्याने उपचारांची उपलब्धता अधिक सुलभ होईल आणि लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यास मदत होईल.

Web Title: Union budget 2026 how budget directly impacts health explainer lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • budget 2026
  • Health News
  • lifestyle news
  • union budget 2026

संबंधित बातम्या

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध
1

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत
2

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Malnutrition Maharashtra: राज्यात ३ वर्षांत ४० हजार बालमृत्यू ! कुपोषणाचा डाग पुसण्यात सरकार अपयशी?
3

Malnutrition Maharashtra: राज्यात ३ वर्षांत ४० हजार बालमृत्यू ! कुपोषणाचा डाग पुसण्यात सरकार अपयशी?

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी
4

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.