CM Devendra Fadnavis and AmrUta Fadnavis Shaskiya Mahapuja Pandharpur Ashadhi Ekadashi 2025
आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाचे संपूर्ण मंदिर सजवण्यात आले आहे. विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आषाढी एकदशीच्या निमित्ताने लाखो भाविक चंद्रभागेच्या तिरी जमा झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हे भक्तीमय वातावरणामध्ये न्हाहून निघाले आहे. 15 लाखांहून अधिक वारकरी हे पंढरपूरमध्ये जमा झाले आहेत.
आषाढी वारीच्या दिवशी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली जाते. पहाटेच्या सुमारास होणाऱ्या या पुजेला विशेष महत्त्व आहे.
यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांची कन्या दिविजा फडणवीस ही देखील होती. साडीमध्ये तयार होऊन दिविजाने पुजेमध्ये सहभाग घेतला.
मिसेस मुख्यमंत्री असलेल्या अमृता फडणवीस यांच्या लूकची नेहमी चर्चा होत असते. यावेळी देखील केसरी रंगाच्या साडीमध्ये अमृता फडणवीस यांनी परंपारिक साज केला होता.
मुख्यमंत्र्यांसह वारीमधील एका वारकरी दाम्पत्याला देखील या पूजेमध्ये मुख्यमंत्र्यांसह पूजा करण्याचा मान मिळत असतो. यंदाच्या वर्षी मानाचे वारकरी कैलास दामु उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. नाशिकमधील उगले दाम्पत्य हे मागील 12 वर्षांपासून वारी करत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारी सोहळ्याचा आनंद घेत फुगडी आणि फेर धरला. चिमुकल्या वारकऱ्यांसोबत क्षण घालवले.