त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित करता लिंबाचे सेवन
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. याशिवाय लिंबू शरीरासाठी अतिशय महत्वाचा आहे. शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी आहारात लिंबाचे सेवन करावे.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाणी प्यायल्यामुळे गॅस, अपचनाच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळतो.
लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी आढळून येते. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स कमी होतात. तसेच लिंबाचा वापर करून तुम्ही फेसपॅक सुद्धा बनवू शकता.
लिंबामध्ये असलेले फायबरमुळे शरीराचे वाढलेले वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित लिंबू पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरावरील चरबी कमी होते.
लिंबूमध्ये नैसर्गिक डिटॉक्स गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर आतून स्वच्छ होते.