शरीराचे रक्षण करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
जेवणाची चव वाढवण्यासाठी दैनंदिन आहारात लसूणचे सेवन केले जाते. लसूण खाल्यामुळे वायुमार्ग साफ होण्यास, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांची लक्षणे कमी होतात. लसूणमध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व गुणधर्म आढळून येतात.
भारतासह इतर सर्वच देशांमध्ये ग्रीन टी चे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ग्रीन टी प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये कॅटेचिन नावाचा घटक आढळून येतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिड युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिन, फ्लॅक्ससीड, चिया बियाणे आणि अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.
विटामिन सी युक्त फळांचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतील. दैनंदिन आहारात संत्री, द्राक्षे आणि लिंबू इत्यादी फळांचे नियमित सेवन करावे.
हळदीमध्ये क्युमिन, शक्तिशाली अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होऊन आरोग्याला अनेक फायदे होतात.