युरिक ॲसिडवर प्रभावी ठरतील पुदिन्याची पाने
पुदिन्याच्या पानांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच आरोग्यसाठी पुदिन्याची पाने अतिशय प्रभावी आहेत. या पानांचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात.
युरिक ॲसिडच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात प्युरीन नसलेल्या पदर्थांचे सेवन करावे. अन्नपदार्थांमध्ये कमीत कमी प्रमाणात प्युरीन असेल तर युरिक ॲसिडची समस्या उद्भवणार नाही.
पुदिन्याच्या पानांचे सेवन तुम्ही या पद्धतीने करू शकता. पुदिन्याची पाने सुकवून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर तयार पावडर कोमट पाण्यात टाकून सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी प्यायल्यास युरिक ॲसिडची समस्या कमी होईल.
पुदिन्याच्या पानांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे सांध्यांमधील वेदना, सूज कमी होऊन आराम मिळतो. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिन्याच्या पानांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
शरीरात जमा झालेले युरिक ॲसिड काढून टाकण्यासाठी पुदिन्याची पाने मदत करतात. पुदिन्याच्या पानांचे सेवन करताना शक्यतो ताजी पाने खावीत.