कॉटनच्या साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी नक्की ट्राय करा 'या' पद्धतीचे ब्लाऊज
कॉटन च्या साडीवर तुम्ही लांब हाताचे सुंदर ब्लाऊज शिवून किंवा विकत घेऊ शकता. लांब हाताचे ब्लाऊज कॉटनच्या साडीवर स्टयलिश लुक देतात.मात्र कॉटनच्या साडीवर दंडामध्ये सैल असलेले ब्लाऊज अजिबात सुंदर दिसत नाहीत.
कॉलर असलेले ब्लाऊज कॉटनच्या साडीवर खुलून दिसतात. कॉलर असलेला ब्लाऊज शिवून त्यावर तुम्ही लांब हात शिवू शकता.
बोटनेक ब्लाऊज किंवा कोप्यामध्ये लांब हात असलेला ब्लाऊज कॉटनच्या साडीवर परिधान केल्यास तुमचे सौदंर्य अधिक खुलून दिसेल.
अनेक महिलांना लांब गळ्याचे ब्लाऊज परिधान करायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा कॉटनच्या साडीवर या पद्धतीचा ब्लाऊज ट्राय करू शकता.
कॉटनच्या साड्या प्रामुख्याने ऑफिसमध्ये किंवा इतर वेळी बाहेर जाताना नेसल्या जातात. त्यावर तुम्ही टर्टल नेक ब्लाऊज शिवून दोन्ही बाजूने बटण लावून घेऊ शकता.