dcm ajit pawar son jay pawar and rutuja patil engagement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या चिरंजीव जय यांचा साखरपुडा पार पडला.
अगदी शाही थाटामध्ये आणि आकर्षक फुलांच्या सजावटीचे या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या कौटुंबिक सोहळ्यामध्ये पवार कुटुंबियांची उपस्थिती होती. जेष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होते.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पुण्यातील घोटावडे येथे स्थित फार्महाऊसवर संपन्न झाला.
जय पवार यांचे लग्न ठरल्यानंतर देखील जय आणि ऋतुजा यांनी शरद पवारांचे आशिर्वाद घेतले होते.
आता त्यांचा साखरपुडा पार पडला असून या कौटुंबिक सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते.
राजकीय द्वेष भावना विसरुन कौटुंबिक सोहळ्यातील ही उपस्थिती राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.