फोटो सौजन्य - सोशल मिडिया
शिखर धवन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्याबद्दल मला खूप दुःख आहे. माझ्या प्रार्थना पीडितांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. आपण सर्वजण सुरक्षित आणि सतर्क राहावे." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दिल्ली बॉम्बस्फोटांची बातमी मिळताच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, "दिल्ली बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी माझे हृदय दुखावले आहे. त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळो आणि जखमींना लवकर बरे होवो." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
माजी भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा यांनी पोस्ट केले की, "मी दिल्लीत शांतता आणि सर्वांना शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करतो. आपल्या शहराचा आत्मा कोणीही तोडू शकत नाही. एकत्र आपण पुन्हा उठू." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
या घटनेनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. २८ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांची बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी लिहिले की, "दिल्लीतील मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची धक्कादायक बातमी समोर येत आहे. माझ्या प्रार्थना आणि संवेदना सर्वांसोबत आहेत." फोटो सौजन्य - सोशल मिडिया