निरोगी राहण्यासाठी नियमित प्या आवळ्याचा रस, त्वचा केसांसह शरीराला होतील भरमसाट फायदे
हल्ली पोटाच्या समस्येंमुळे सर्वच लोक त्रस्त आहेत. पोटाच्या समस्या उद्भवल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. अशावेळी आवळ्याचे सेवन करावे. आवळ्याचा रस नियमित प्यायल्यास अतिसार, स्नायू पेटके, पोटात पेटके आणि अस्वस्थता इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळते.
हृदयरोग्यांसाठी नैसर्गिक उपचार म्हणून आवळ्याचा रस प्यायला जातो. यामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होतात.
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास आवळ्याचा रस प्यावा. याशिवाय बदलत्या ऋतूंमध्ये सर्दी, खोकला आणि संसर्ग यांसारखे हंगामी आजार टाळण्यासाठी आवळ्याचा रस प्यावा.
महिलांसह पुरुषांमध्ये केसांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. केसांच्या समस्या कमी करण्यासाठी नियमित एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देते.
किडनीच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळ्याचा रस प्यावा. यामुळे किडनी डिटॉक्स होते आणि घाण बाहेर पडून जाते. किडनीचे कार्य सुधारण्यासाठी नियमित एक आवळा खावा.