केसांच्या वाढीसाठी प्रभावी फुल
केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी रोझमेरी तेलाचा वापर करावा. खोबरेल तेलात रोझमेरीचे तेल मिक्स करून केसांच्या मुळांना लावून काहीवेळाने केस पाण्याने स्वच्छ धुवा.
गुलाब पाण्याचा वापर केस हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी केला जातो. केसांना गुलाब पाणी लावून काहीवेळा मसाज करून नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा. हा उपाय केसांसाठी अतिशय प्रभावी आहे.
जास्मिन ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे केसांची वाढ होते आणिकेस तुटण्यापासून वाचतात. शिवाय या तेलामुळे केसांची टाळू निरोगी राहते.
मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी लॅव्हेंडर तेलाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये लॅव्हेंडर तेल आणि खोबरेल तेल घेऊन मिक्स करावे. त्यानंतर केसांना या तेलाने हलक्या हाताने मसाज करा.
केसांच्या लांबलचक वाढीसाठी जास्वंदीचे फुल अतिशय प्रभावी आहे. जास्वंदीच्या फुलात असलेले गुणधर्म टाळू वरील घाण स्वच्छ करण्यास मदत करतात. तसेच जास्वंदीच्या फुलांची पेस्ट बनवून केसांना लावून ठेवा.१० मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा.