श्रावण महिन्यात सौंदर्यात घाला भर, खरेदी करा 'या' सुंदर डिझाईनच्या चांदीच्या जोडव्या
काहींना पारंपरिक दागिन्यांची खूप जास्त आवडत असते. त्यामुळे तुम्ही पाच फेऱ्यांची पारंपरिक आणि ठसठशीत जोडवी श्रावणात खरेदी करू शकता.
रोजच्या वापरासाठी तुम्ही चांदीच्या नाजूक डिझाईनमधील जोडव्या खरेदी करू शकता. कारण कोणताही ड्रेस किंवा वेस्टन कपडे घातल्यानंतर पाय सुंदर दिसतील.
बाजरात फुलांच्या आकारातील जोडव्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. पायांमध्ये प्रामुख्याने चांदीची जोडवी घालावी. कारण मेटालिक धातूंपासून बनवलेली जोडवी पायांना इजा पोहचवते.
नऊवारी किंवा सहावारी साडी नेसल्यानंतर अनेक महिला पायात मासोळ्या घालतात. या जोडव्या पायात घातल्यानंतर अतिशय उठावदार दिसतात. तसेच तुमच्या पायांची शोभा वाढते.
रोजच्या वापरात महिलांना अतिशय सिंपल आणि नाजूक डिझाईनची जोडवी घालायला खूप जास्त आवडते. त्यामुळे जोडव्यांच्या या डिझाईन्स तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहेत.